परवा कोल्हापूरच्या 'बच्चन वेडे' ग्रुप चा एक झक्कास, रंगतदार कार्यक्रम पार पडला. खरंतर कोल्हापुरात हजारानं बच्चन वेडे आहेत... पण आजची बातमी जरा खासच आहे. साक्षात अमिताभ बच्चन यांना ज्यांनी वेड लावलं... त्या कोल्हापुरातील आपल्या चेतना च्या मुला-मुलींची.
दोन वर्षांपूर्वी दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेने भरवलेल्या राष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये पुढे आलेली एक संकल्पना अल्पावधीतच रुजली... बहरली. सर्व प्रकारातील विकलांग विद्यार्थ्यानी एकत्र येऊन अमिताभ बच्चन यांच्या साथीने राष्ट्रगीत गायन करावे अशी ती संकल्पना होती. दिग्दर्शक म्हणून गोविंग निहलानी आणि संगीतकार म्हणून आदेश श्रीवास्तव यांनी जबाबदारी उचलली.
या संकल्पनेत अमिताभ बच्चन यांच्या सोबतचे मुख्य कलाकार आहेत अडॅप्ट (मुंबई), हेलन केलर इन्स्टिटयूट फॉर द ब्लाइंड (मुंबई), कामाला मेहता स्कुल फॉर द ब्लाइंड (मुंबई), कीर्ती कालरा व सिमरन कालरा (नवी दिल्ली) आणि आपली चेतना विकास मंदिर चे निवडक विद्यार्थी अन विद्यार्थिनी.
करोडो रुपये मानधन घेऊन काम करणारे साक्षात अमिताभ बच्चन ज्यांच्या सोबत नि:शुल्क काम करण्यास आतुर होते... त्या आपल्या चेतना च्या मुला-मुलींना आता आपण कोल्हापूर वासियांनी हुरूप देण्याची गरज आहे.
यायला लागतंय हे काय सांगायला लागतंय का?
.
.
.
अहो यायलाच लागतंय. हो... यायलाच लागतंय.
.
.
.
१३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता.
केशवराव भोसले नाट्यगृह इथं.
